Rules and Reguletions/नियम व अटी

           ⬛गृपचे नियम व अटी ⬛



*1)* या गृपवर अॕडमिनला विचारून परवानगी शिवाय Good morning/night/ वाढदिवस आणि वैयक्तिक फोटो पोस्ट करू नये.

*2)* गृप मधिल सदस्यांनी आक्षेपार्य वर्तणूक कॉलेज व कॉलेज बाहेर न करणे..

*3)* आपला गृप गृप नसुन एकाच कुटुंबातील सदस्य आहोत ही भावना नेहमी जागृत ठेवा..

*4)* आपल्याच गृपमधील सदस्याची वर्तणूक योग्य नसेल तर सगळ्यांनी वेळीच समज द्या बदल होत नसेल तर त्यास Remove करा..

*5)* शिवराज्य गृपचा प्रत्येक सदस्य 'शिवराज्य' गृपचा सम्मान वाढवण्याचाच प्रयत्न करेल..

*6)* हा गृप मुलींच्या सबलीकरणासाठी आहे या गृप मध्ये मुलं आणि मुली दोघांचाही समावेश आहे. गृपचे नाव शिवराज्य आहे त्याला साजेसे आपले वर्तन असावे..

*7)* येत्या काळात आपण आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या गृपमध्ये. समाविष्ट करणार आहोत आणि त्यांना समुपदेशन देऊन चांगल्या आयुष्याकडे नेणार आहोत

 त्यासाठी आपण पहिले तयार होऊया..

*8)* सदर गृप निर्माण करण्यामागे मूलतः स्त्रीसंरक्षण आणि स्त्री-सबलीकरण हे हेतू असून त्या साठी उपयुक्त आशे विचार आणि कल्पना आपण इथे मांडू शकता/मांडण्यात याव्या.

*9)* वरील विषयास अनुसरून येणाऱ्या कल्पना तसेच विचार ह्यावर एकत्रपणे   विचारविनिमय करून आपण नियुक्त केलेली समिती योग्य तो निर्णय घेईल.

*10)* सदर विषयानुरूप प्राथमिक तसेच उपयुक्त बदल सर्वप्रथम स्वतः अंगिकरून इतरांना सुचवावेत.

*11)* गृप मध्ये सर्वांना समानाधिकार असावेत स्त्रीपुरुष समानता हा ह्या गृप चा महत्वाचें तत्व असेल.

*12)* वयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर महिला सबलीकरणासाठी प्रबोधन करण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत.

*13)* आपल्या माताभगिनींवर होणाऱ्या अत्याचाराची कारणे शोधून त्याच्या मुळाशी जाऊन उपाय करण्याचा प्रयत्न करणे.

*14)* जबाबदारीने सतत ग्रुपच्या संपर्कात रहाणे व वेळच्या वेळी होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणे

*15)*मूळ विषयाशी समबंधीत ऐनवेळी येणाऱ्या विषयाला देखील प्राधान्य देणे* . 

*16)* मोठ्या व्यक्तीचा आदर करणे आणि लहान किंवा नवख्या सभासदांना समजावून घेणे मदत करणे.

Comments